राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या दिल्लीतील 6 जनपथ या निवासस्थानी आज विरोधी पक्षांच्या नेत्यांची बैठक होणार आहे. सायंकाळी सहा वाजता ही बैठक होणार आहे. काँग्रेससह इतर पक्षांच्या नेत्यांना या बैठकीसाठी आमंत्रण देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. दरम्यान, तृणमूल काँग्रेस आणि समाजवादी पार्टीने आपण काँग्रेस आणि भाजपला समान अंतरावर ठेवणार असल्याचं म्हटलं आहे. त्यामुळं आजच्या बैठकीला काँग्रेस उपस्थित राहणार का? हा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
आज सायकांळी सहा वाजता दिल्लीच शरद पवारांच्या विरोधी पक्षांच्या नेत्यांची बैठक होणार आहे. या बैठकीत विविध मुद्यांसह ईव्हीएमच्या मुद्यावरही चर्चा होणार आहे. निष्पक्ष निवडणुका होण्यासाठी ईव्हीएम (EVM) यंत्रणा अचूक आणि कार्यक्षम असणं आवश्यक असल्याचं विरोधकांचं म्हणणं आहे. अनेक विरोधी पक्षांच्या नेत्यांनी ईव्हीएममध्ये गैरप्रकार झाल्याचा आरोप करत सत्ताधारी भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे. काही तज्ज्ञांच्या मते, चिप बसवलेल्या कोणत्याही मशीनला हॅक करता येणं शक्य आहे. यासंदर्भात या बैठकीत चर्चा होणार आहे.  
दरम्यान, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री तृणमूल नेत्या ममता बॅनर्जी आणि तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी भाजपविरोधात विरोधकांची मोट बांधण्यासाठी स्वतंत्र प्रयत्न सुरु केले आहेत, तर काँग्रेसला वगळून विरोधकांची आघाडी शक्य नाही, असा पवित्रा काँग्रेसने घेतला आहे. 2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विरोधकांची काय भूमिका हवी यावर देखील या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे.






नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी एक सुवर्णसंधी आहे. मध्य प्रदेश स्टाफ सिलेक्शन बोर्ड (MPPEB) ने स्टाफ नर्स, ANM, मिडवाइफ, फार्मासिस्ट आणि गट 5 (MPPEB Bharti 2023) मध्ये इतर पदांच्या भरतीसाठी प्रक्रिया सुरू केली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांना विनंती आहे की त्यांनी या पदांसाठी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत अधिसूचना काळजीपूर्वक वाचावी. MPPEB गट 5 साठी अधिकृत अधिसूचना 15 मार्च 2023 रोजी अधिकृत वेबसाइट peb.mponline.gov.in वर प्रसिद्ध करण्यात आली. गट 5 च्या भरतीसाठीचे फॉर्म फक्त ऑनलाइन सादर केले जातील. MPPEB साठी फॉर्म भरण्याची सुरुवातीची तारीख 15 मार्च 2023 आहे आणि ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 मार्च 2023 आहे. यावर्षी एकूण 4792 रिक्त पदांची घोषणा करण्यात आली होती परंतु आता ही रिक्त पदे 4852 पर्यंत वाढवण्यात आली आहेत.
MPPEB साठी शैक्षणिक पात्रता काय आहे
स्टाफ नर्स- उमेदवारांनी बायोलॉजी/ बीएससी नर्सिंगसह 10+2 उत्तीर्ण केलेले असावेत आणि त्यांनी नर्स म्हणून नोंदणी केलेली असावी.
ANM/मिडवाइफ- उमेदवारांनी जीवशास्त्र/मिडवाइफरी अभ्यासक्रमासह 10+2 उत्तीर्ण केलेले असावेत.
फार्मासिस्ट ग्रेड 2 – कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेतून फार्मसीमध्ये डिप्लोमा/पदवी.
सहाय्यक पशुवैद्यकीय अधिकारी- उमेदवारांनी जीवशास्त्र या विषयांपैकी एक विषय म्हणून 12 वी उत्तीर्ण केलेली असावी. संबंधित विषयात डिप्लोमा असणे आवश्यक आहे.
प्रयोगशाळा सहाय्यक / तंत्रज्ञ – जीवशास्त्र विषयांपैकी एक विषय म्हणून 12 वी उत्तीर्ण आणि संबंधित विषयातील डिप्लोमा.
रेडिओग्राफर- विज्ञान विषयासह 12वी उत्तीर्ण आणि रेडिओग्राफीमध्ये डिप्लोमा.
ड्रेसर- ड्रेसरचे ज्ञान असलेल्या कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्ड किंवा संस्थेतून इयत्ता 12 वी उत्तीर्ण असावी.
वयोमर्यादा काय असेल?
जे उमेदवार या पदांसाठी अर्ज करत आहेत, त्यांची वयोमर्यादा 21 ते 40 वर्षे दरम्यान असावी. शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार वयोमर्याद



भरधाव वेगात येणाऱ्या ट्रकने भाविकांनी भरलेल्या पिकअपला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात ३ भाविकांचा जागीच मृत्यू झाला. तर ११ जण गंभीर जखमी झाले. मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये एका १४ वर्षीय मुलाचा देखील समावेश आहे. अहमदनगर-पुणे महामार्गावरील कामरगाव शिवारात ही दुर्देवी घटना घडली.
घटनेची माहिती मिळताच, स्थानिक नागरिकांसह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी ३ भाविकांचे मृतदेह ताब्यात घेतले असून जखमींना तातडीने उपचारासाठी अहमदनगर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. देवदर्शनाहून येणाऱ्या भाविकांवर अचानक काळाने घाला घातल्याने परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अपघातग्रस्त भाविक हे देवगड आणि शनिशिंगणापूरचे दर्शन घेऊन पुण्याच्या दिशेने येत होते. त्याचवेळी पुण्याहून-नगरच्या दिशेने भरधाव वेगात ट्रक येत होता. दरम्यान, दोन्ही वाहने कामरगाव शिवारात आली असता, ट्रकचालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले.
त्यामुळे ट्रक अनियंत्रित होऊन भाविकांच्या पिकअपला धडकला. ही धडक इतकी भीषण होती की, यामध्ये ३ भाविकांचा जागीच मृत्यू झाला. तर इतर ११ भाविक गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या घटनेनं मोठी हळहळ व्यक्त होत आहे.

काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यासाठी एक धक्कादायक बातमी आहे. कर्नाटकातील एका रॅलीत राहुल गांधी यांनी एक सवाल केला होता. नीरव मोदी, ललित मोदी, नरेंद्र मोदी यांचं आडनाव कॉमन कसे? सर्व चोरांची नावे मोदीच का असतात? असा सवाल राहुल गांधी यांनी केला होता. या प्रकरणी सुरत न्यायालयात केस सुरू होती. त्यावर निर्णय आला असून सुरत जिल्हा सत्र न्यायालयाने राहुल गांधी यांना दोषी ठरवलं आहे. त्यांना याप्रकरणी शिक्षा ठोठावली जाणार आहे. सुनावणीवेळी राहुल गांधी कोर्टात हजर होते.
2019मध्ये राहुल गांधी यांच्या विरोधात ही केस करण्यात आली होती. त्यावर सुनावणी सुरू होती. आज या खटल्यावर सुरत जिल्हासत्र न्यायालयाने निर्णय दिला. थोड्याच वेळात शिक्षाही सुनावली जाणार आहे. यावेळी राहुल गांधीही कोर्टात उपस्थित होते. तसेच काँग्रेसचे गुजरातचे प्रदेशाध्यक्ष जगदीश ठाकोर, आमदार अमित चावडा आणि अखिल भारतीय काँग्रेस समितीचे गुजरात प्रभारी रघू शर्माही उपस्थित होते. याशिवाय काँग्रेसचे इतर आमदारही कोर्टात उपस्थित होते. त्यापूर्वी राहुल गांधी यांचे वकील किरीट पानवाला यांनी मीडियाशी संवादही साधला होता.
2019च्या लोकसभा निवडणुकीत राहुल गांधी यांनी दक्षिणेत जोरदार प्रचार केला होता. त्यांची कर्नाटकात एक विराट रॅली झाली होती. या सभेला संबोधित करताना सर्व चोरांची आडनावे मोदीच का असतात? असा सवाल केला होता. राहुल गांधी यांच्या या विधानावर गुजरातचे भाजप नेते आणि आमदार पूर्णेश मोदी यांनी आक्षेप घेतला होता. पूर्णेश मोदी यांनी राहुल गांधी यांच्या विरोधात मानहानीचा दावाही केला होता.


राजकारण असो किंवा बॉलिवूड, प्रत्येक क्षेत्राबद्दल आपलं मत बिंधास्तपणे मांडणाऱ्या अभिनेत्री कंगना रनौतचा आज 36वा वाढदिवस आहे. कंगनाचा जन्म 1987 मध्ये हिमाचल प्रदेशमधील मंडी येथे झाला. शालेय शिक्षण कंगनाने तिथेच घेतले. कंगनाच्या वडिलांची इच्छा होती की, तिनं डॉक्टर व्हावं. पण कंगना 12 वीमध्ये फेल झाली. कंगनाला मनोरंजनक्षेत्रामध्ये काम करण्याची इच्छा होती. तिच्या या इच्छेला तिच्या कुटुंबाचा विरोध होता. त्यामुळे तिनं वयाच्या 16 व्या वर्षी घर सोडण्याचा निर्णय घेतला.
16 व्या वर्षी घर सोडून कंगना दिल्ली येथे गेली. दिल्लीमध्ये कंगनानं मॉडेलिंग करण्यास सुरुवात केली. महेश भट्ट यांनी कंगनाला बॉलिवूडमध्ये पहिली संधी दिली. इमरान हाश्मी आणि शायनी आहुजासोबत गँगस्टर चित्रपटात काम करण्याची संधी कंगनाला मिळाली. त्यानंतर कंगनाच्या मनोरंजन क्षेत्रातील प्रवासाला सुरुवात झाली. फॅशन, तनु वेड्स मनु, क्विन तनु वेड्स मनु रिटर्न्स, मणिकर्णिका यांसारख्या हिट चित्रपटांमध्ये काम केलं. कंगनाच्या अभिनयाचं अनेक जण कौतुक करतात. कंगनाला तिच्या कला क्षेत्रातील कार्यामुळे राष्ट्रीय पुरस्कार आणि पद्मश्रीनं सन्मानित करण्यात आलं आहे.

कोलकाता

सामान्य